न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील लोखंडी पीएमपी बस स्टॉपला चक्क उताण्या अवस्थेत झाडांचा आधार दिला गेला आहे.
या बस स्टॉपचे खालील स्टीलचे पाय कापले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या त्याच्या ओझ्याने दबल्या आहेत. या बस स्टॉपपासून ईएसआयसी रुग्णालय आणि डी मार्ट हाकेच्या अंतरावर आहे.
नेहमीचा वाहता रस्ता असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. बस स्टॉप अशा अवस्थेत असल्यामुळे भर उन्हात नागरिकांना बसची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने बस थांबा पूर्वरत करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.















