न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रँव्हरलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
टेम्पो ट्रँव्हलर जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघेही कंपनीचे कर्मचारी होते. एका कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली.
त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हिंजवडीतील या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात आयटी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीत प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडीट आणि वाहनचालक, सहायक यांच्या सतर्कतेबाबत उपायायोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा. या करिता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार आहे. – महेश लांडगे, आमदार-भोसरी विधानसभा, भाजपा…











