- तब्बल तीन वर्षानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- आपआपसात संगनमत करुन रेल्वेमध्ये अधिकारी असल्याचे भासवले. रेल्वेमध्ये नोकरी लावण्यांचे आमिष दाखवले. त्यासाठी अकाउंटवर फिर्यादीकडुन १,७९,०००/- रुपये, फिर्यादीची बहिण हिचेकडुन २,८६,०००/- रुपये व मुजीब नागरदिनी याचेकडुन ४,१४,६००/- रुपये पाठविण्यास सांगुन व फिर्यादीचे वडीलांकडुन रोख स्वरुपात २,९८,०००/- रुपये घेवुन एकुण ११,७७,६००/-रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना जवळपास तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन स्वरुपात, केईएम हॉस्पिटल, पुणे येथे घडली. याप्रकरणी महिलेने १) महिला आरोपी २) महिला आरोपी, ३) प्रशांत तलरेजा, मोहनदास तलरेजा यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि इंगळे पुढील तपास करीत आहेत.


















