- आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत वेधल लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्या असून बहुतांश ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरू आहेत. या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बांधकाम ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू आहेत. सोबतच मूळ झोपडी धारकाला त्याचे हक्काचे घर मिळत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार सुरू आहे.
या कामांवर प्रशासनाचा अंकुश दिसत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सोबतच मागासवर्गीय गरीब हा आपल्या हक्काच्या मूळ घरापासून पूर्णतः वंचित राहिला असून पुणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पावरती अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एक समिती गठित करणे अत्यंत गरजेच आहे.
जेणेकरून संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या घर धारकाला आपल्या हक्काच्या घराचा लाभ मिळावा. याकरिता आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी केली आहे.















