न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- देहुनगर पंचायतीच्या पाणीपट्टी व मिळकत कर वसुलीसाठी आलेल्या पथकाला शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी घडली.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कर वसुली पथक शासकीय गायरान जागेवरील ठिकाणी आले असता, तिथे थकीत कर न भरल्याने नळजोड तोडताना बालाजी झोंबाडे यांनी हस्तक्षेप करीत गर्दी जमवली व अन्य दोन महिलांसह सरकारी कामात अडथळा आणला. तसेच शिवीगाळ करीत सरकारी पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यास नकार दिला असे, फिर्यादीत नमुद आहे.
याप्रकरणी झोंबाडे व दोन महिला यांच्या विरोधात देहूरोड पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.











