न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :-माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे १५ टक्के काम बाकी आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पाचा आढावा पीएमआरडीए आयुक्तांनी घेतला.
पीएमआरडीए मेट्रो ही शिमला ऑफिस येथे महामेट्रोला कनेक्ट होणार आहे. त्या अंतिम टप्प्याची माहिती आयुक्तांनी घेतली.
यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि अधिकारी उपस्थित होते.
सध्या स्टेशन सुशोभिकरण फिनिशिंगसह सिग्नलच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दोन ते तीन महिन्यांनी मेट्रो रनची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे. २३ पैकी १२ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
सध्या मेट्रो स्थानकांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. तसेच, सिग्नल यंत्रणांचीही कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून मेट्रोची चाचणी घेतली जाईल.
– रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए…











