न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- नेरे दत्तवाडी येथील ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र ठरविण्याचा निकाल नुकताच अप्पर आयुक्त पुणे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीची थकबाकी न भरल्यामुळे सदस्य राजू जाधव व अजित ओव्हाळ यांना आपले ग्रामपंचयत सदस्यत्व गमवावे लागले आहे.
नेरे दत्तवाडी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये पार पडली. त्या निवडणुकीत अजित ओव्हाळ व राजू जाधव हे निवडून आले. त्यानंतर २०२३/ २४ च्या ग्रामपंचायतीची थकबाकी भरण्यासाठी त्यांना बिल देण्यात आले. त्यांनी ९० दिवस उलटून ही ग्रामपंचायतीची थकबाकी भरली नाही, त्यामुळे त्यांना अपात्र करावे यासाठी राहुल सीताराम जाधव यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दोघांविरुद्ध अर्ज दाखल केला होता.
जिल्हाधिकारी यांनी चौकशीसाठी ते प्रकरण जिल्हा परिषदेकडे वर्ग केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करून या दोन सदस्यांनी मुदतीत कराची थकबाकी भरली नाही, असा अभिप्राय दिला तसेच जिल्हाधिकारी यांनी राहुल जाधव यांचा अर्ज फेटाळून लावला.











