न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- ISKCON श्री गोविंद धाम, रावेत यांच्या वतीने भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षा पार पडली. या परीक्षेत ३५ शाळांमधील एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा ग दि माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे उत्साहात पार पडला.
यावेळी राम तिळक (CTO, बजाज ऑटो), शिवाजी आखाडे (MD, ऑटो लाईन इंडस्ट्रीज), रोहिणी कुमार प्रभु, गोपती प्रभु आणि जगदीश गौरांग प्रभु आदी उपस्थित होते.
ही परीक्षा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती. गट ५ वी ते ७ वी आणि गट ८ वी ते १० वी. या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १४० विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
पीसीएमसी परीक्षेतील गट ५ वी ते ७ वीतील प्रथम: कार्तिक तुकाराम सुळे (संत तुकाराम विद्यालय, देहू) लेनोवो टॅब, द्वितीय राणी उमाकांत बिरादार (सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोरे वस्ती, चिखली) सायकल, तृतीय प्रज्ञा निलेश मेंगडे (भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसरी) – स्मार्ट वॉच, गट ८ वी ते १० वी प्रथम कार्तिक भगवान मुसळे (श्रमजीवी विद्यालय, भोसरी) लेनोवो टॅब, द्वितीय शर्वरी सचिन गुर्जर (ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय) सायकल, तृतीय अक्षरा नामदेव जगदाळे (भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसरी) स्मार्ट वॉच, अशी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत.
कार्यक्रमात सर्व मुख्याध्यापकांचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून सत्कार करण्यात आला. भगवद्गीतेवरील या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक तसेच नैतिक मूल्ये रुजवण्याचा संकल्प करण्यात आला.