- ट्रॅव्हल्सची कार्यालये आणि बससेवा या काळात बंद राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलीस विभागाने खासगी बससह पिकअप आणि वाहतूक रस्त्यांवर केलेली बंदी हटविण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड ट्रॅव्हल्स असोसिएशन धरणे आंदोलन करणार आहे. पिंपरी चिंचवड ट्रॅव्हल असोसिएशनचे सचिव बाळा दानवले यांनी ही माहिती दिली.
या संदर्भात बाळा दानवले यांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांनी पिकअप बंद केले आहे. वारंवार पिकअप पॉईंट बदलले जात आहेत. त्याचा ग्राहकांनाही त्रास भोगाव लागत आहे.
देण्यात आलेले पिकप पॉईंट हे आऊटसाईड भागात आहेत. त्या भागात बस आणि रिक्षा जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. एकतर पिंपरी चिंचवडमधून लांब पल्ल्याच्या बसेस किंवा रेल्वेची सोय नाही. ट्रॅव्हल व्यवसायिक ही सुविधा उपलब्ध करून देत असताना त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि ट्रॅव्हल व्यवसायिकांवरही अन्याय होत
आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे
वाहतूक पोलीस विभागाने अन्यायकारक कारवाई करून आपल्यावर लादलेल्या बस रस्ते बंदी हटवण्याकरिता व पूर्ववत पिकप चालू करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे धरणे आंदोलन सोमवार दि. ७ एप्रिल पासून सकाळी १० ते सायं ६ वाजेपर्यंत चिंचवडगाव वाहतूक विभाग कार्यालय येथे येथे करण्यात येणार आहे या काळात ट्रॅव्हल ऑफिसेस व ट्रॅव्हल बससेवा बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने ट्रॅव्हल्स बसेस थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, योग्य त्या ठिकाणी पिकप पॉईंट द्यावेत अशी आमची मागणी आहे. पोलीस आयुक्त तसेच वाहतूक पोलिसांना आंदोलनाबाबत पत्र देण्यात आले आहे, असे बाळा दानवले यांनी सांगितले.











