न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२५) :- यापुढे मद्यपान करून गाडी चालवणारा चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत.कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पासपोर्ट मिळवण्यास परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.