न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- शहरातील खासगी बससह पिकअप आणि रस्त्यांवर केलेली बंदी हटविण्यासह आदी मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि चालक मालक सोमवारी धरणे आंदोलन करणार होते. दरम्यान शहर वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी मध्यस्थी करीत सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान औंध हॉस्पिटल पिकअप चालू करणे, काळेवाडी पिकअप चालू करणे, तसेच निगडीतील मुख्य पुलावर चढण्यासाठी रस्ता, निगडीतील मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर इंस्पिरिया मॉलचा पिकप पूर्ववत करू, असे आश्वासन बांगर यांनी चर्चे दरम्यान दिले आहे.
तसेच वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या पिकअप पॉईंटच्या ठिकाणी वाहतूक पोलीस दंड आकारत असतील तर, चालक मालक थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. नेमून दिलेल्या मार्गावरील वाहनाचा फोटो काढून पावती करणार नाही, असंही आश्वासन बांगर यांनी दिले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड ट्रॅव्हल असोसिएशनने सोमवारचे नियोजित धरणे आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव बाळा दानवले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.














