- मोशीतील नागेश्वरनगर येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
- शहरातील ३८ कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिश्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १७) रोजी ४३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात २८ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील वडगांव शेरी, म्हाळूंगे खेड, देहुरोड, येरवडा, आंबेगांव, कोथरूड येथील चार पुरुष आणि दोन महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मोशीतील नागेश्वरनगर येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३७३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ५१३ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ०८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण शिंदेनगर जुनी सांगवी, यमुनानगर निगडी, पंचतारानगर आकुर्डी, विशाल ई स्केअर पिंपरी, क्रांतीनगर आकुर्डी, संत तुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, शास्त्रीनगर पिंपरी, रमाबाईनगर पिपरी, साईबाबानगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, वैभवनगर पिंपरी, आनंदनगर, पिंपळेगुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाहीनगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, बौध्दनगर पिंपरी येथील रहिवासी आहेत.
आज आनंदनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, भारतनगर पिंपरी, सदगुरु कॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर पिपरी, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळे गुरव, पिंपरीगांव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी च-होली, गवळीनगर भोसरी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एम.बी.कॅम्प देहूरोड, दिघीरोड भोसरी, खंडोबामाळ भोसरी, दत्तमंदीर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील ३८ कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.