- पिंपरीतील गांधीनगर व पिंपळे सौदागरच्या दोन पुरूषांचा कोरोनामुळे मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 27. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. 27) रोजी 160 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 88 पुरूष 72 महिलांचा समावेश आहे.
आज मृत झालेले रुग्ण गांधीनगर, पिंपरी ( पुरुष, वय- ५२ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष , वय- ५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2565 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 994 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 03 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण फुलेनगर , दिघी रोड भोसरी , लक्ष्मीनगर पिंपळे गुरव आनंदनगर चिंचवड , चांदणीनगर , प्लॅनेट मिनियम पिंपळे सौदागर , विकासनगर , निगडी , रामनगर , जाधववाडी , राजीव गांधी वसाहत नेहरुनगर , शंकरनगर , साईबाबानगर चिंचवड , अजंठानगर , महेशनगर भोसरी , इंदिरानगर चिंचवड , घुले चाळ बोपखेल , प्राधिकरण , गांधीनगर पिपरी , थेरगाव , बिजलीनगर चिंचवड , स्टेशन रोड पिंपरी , वाकड , म्हेत्रेवस्ती चिखली , भाटनगर पिपरी , गवळीमाथा भोसरी , ज्योतिबानगर काळेवाडी , सुदर्शननगर सौदागर , आनंदनगर सांगवी , रुपीनगर तळवडे , बापदेवनगर देष्टुरोड , जयमहाराष्ट्र चौक कासारवाडी , -दिघी . विठ्ठलनगर पिंपरी , बौध्दनगर पिंपरी , भिमनगर पिपरी , लक्ष्मीचौक दापोडी , गणेशनगर थेरगाव , केशवनगर कासारवाडी प्रेमलोकपार्क चिंचबर , सोनाईनरग व सहारा कॉम्पलेक्स चिखली , काळेवाडी , क्रिश्ना पार्क काळभोरनगर चिंचवड , लिंकरोड पिंपरी , प्रियदर्शनीनगर पिपळे निलख , शिव क्लासिक सोसयटी मोशी , नटराज सोसायटी नेहरुनगर , डिमार्टजवळ चिंचवड , वास्तुउद्योग अजमेरा , खंडोबामाळ भोसरी , प्रभातनगर पिंपळे गुरव , ऍव्हलॉन सिटी दापोडी , कुलदिप आंगन नेहरुनगर , मंगलनगर बाकड , गंगानगर निगडी , आश्रमरोड चिखली , भगतवस्ती भोसरी , प्रविणनगर तळवेड , त्रिवेणीनगर तळवडे , नखातेवस्ती केशवनगर चिंचवड , शुभश्री आकुर्डी , दिघीरोड भोसरी , एम्पायर इस्टेट चिंचवड , कोकणेनगर काळेवाडी , कैलासनगर थेरगाव , जुन्नर , हडपसर , बोपोडी , सोलापुर येथील रहिवासी आहेत.
आज सानेवस्ती चिखली , बौध्दनगर पिंपरी , हॉटेल सृष्टी पिंपळे गुरव , भारतनगर दापोडी , वैदूवस्ती पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख , पवारवस्ती दापोडी , आनंदनगर सांगवी , दिघीरोड भोसरी, बोपखेल, साईबाबनगर चिंचवड, पाचपीर चाळ काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी , यमुनानगर निगडी , अजंठानगर , इंद्रायणीनगर भोसरी , जगताप डेअरी पिपळे निलख , रौंधळे चाळ दापोडी , जयभिमनगर दापोडी , आनंदनगर चिंचवड , घरकुल चिखली , सुदर्शननगर चिखली , कोकणेनगर काळेवाडी , पुर्णानगर , दत्तनगर चिंचवड , मिलींदनगर पिंपरी , रिव्हररोड पिंपरी , बिजलीनगर चिंचवड , गणेशनगर सांगवी , गांधीनगर पिंपरी , बौध्दनगर पिंपरी , केंद्रीय विद्यालय मोशी , शर्माचाळ नेहरुनगर , येरवड़ा , कुर्डवाडी , गणेशखिंड , देहुरोड कॅन्टोनमेंट , मंगळवार पेठ , बोपोडी येथील रहिवासी असलेले कोविड १९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा.