- चाकणमधील म्हाळुंगे परिसरातील एकाच कंपनीत १२० कामगारांना कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- खेड तालुक्यातील महाळुंगे येथील एका कंपनीत तब्बल १२० कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील बहुतेक राजगुरूनगर व परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या कंपनीने सुमारे सातशे जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील १२० जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले. दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी महाळुंगे येथील कंपनी व्यवस्थापनाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली आहे.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले कामगार कोण कोणत्या परिसरातील आहे. याबाबत छाननी करण्याचे काम सुरू आहे. तसेच राजगुरुनगर व परिसरातील ग्रामीण भागातील जवळपास तीस ते पस्तीस कामगार या कंपनीत कामास होते. त्यामुळे या कामगारांच्या गावीही भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.