न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- दिघी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी या ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून शुक्रवारी रात्रपाळी ड्युटीवर होत्या. तर आरोपी पोलीस कर्मचारी बढेकर दिघी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. हे चऱ्होली येथे मार्शल म्हणून रात्रपाळी ड्युटीवर होते.
मात्र, ते तिथे न थांबता मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत दिघी पोलीस ठाण्यात गेले आणि पोलीस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ केली, अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी मारुती बढेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.