न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका वेटरने दुसऱ्या वेटरवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. ९) पहाटे हिंजवडी येथील टेकटोना हॉटेलमध्ये घडली.
बिन्दरूलाल जगतलाल (वय ३५, सध्या रा. हिंजवडी फेज -३, टेकटोना हॉटेल, हिंजवडी) असे जखमी झालेल्या वेटरचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मनीष सचिन राणे (वय २२, रा. मु. पो. अंबवडे बुद्रुक, ता. जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी काम संपल्यावर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दारू पीत बसले होते. त्यावेळी फिर्यादी बिन्दरू लाल आणि दुसरा कामगार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी चिडलेल्या राणे याने बिन्दरू लाल यांच्या छातीवर चाकूने वार केले.