न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- पती व मुलांपासून वेगळे राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आणि त्याची व्हिडीओक्लीप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा २००८ ते २०२० पर्यंत विविध ठिकाणी घडल्याची तक्रार पिडीत महिलने दिली आहे. मनोज पांडुरंग बनसोड असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तो सध्या वाकड पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहे.
पिढीत महिलेने २००६ मध्ये एका पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. २००८ मध्ये त्या पोलिसाची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे पिडीत महिला हताश झालेल होती. त्याचा फायदा घेत मनोज बनसोड यांने तिला मदतीच्या बहान्याने ओळख वाढविली. संबंधीत पोलिसाच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागू त्यासाठी वाटेल ती मदत करेन असे आश्वासन दिले व मैत्री वाढविली. मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मनोजने तिला मुंबईत नेले व परत येताना उरुळी देवाची येथील हॉटेल जंजीरा येथे जेवणासाठी थांबून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले व हॉटेलमधील रुममध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून लोणी काळभोर परिसरातील हॉटेलसह तिच्या घरी व कोकणात, दिवेआगार, दापोली येथे नेऊन तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. गेल्या काही महिन्यांपासून मात्र मनोजने तिला टाळायला सुरवात केली. पिडीत महिलेने त्याला लग्नाविषयी वारंवार विचारल्यावर त्याने लग्नास स्पष्टपणे नकार दिला होता