न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाची प्रभाग समितीची बैठक बुधवार (दि. ५) रोजी पार पडली. या बैठकीस प्रभाग समिती अध्यक्षा करूणा चिंचवडे, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, नगरसेविका नीता पाडाळे, उषा काळे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
ब क्षेत्रीय कार्यालयातील समितीच्या बैठकीत अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे नगरसेवकांनी मांडलेले नागरिकांचे प्रश्न गेली कित्येक महिन्यां पासून प्रलंबित आहेत. पाणी पुरवठा, कचरा, रस्ते, उद्यान-शाळा-दवाखाने यांची दुरवस्था झाल्याचे प्रश्न नागरिक नगरसेवकांपुढे मांडत आहेत. हे प्रश्न या बैठकीत उपस्थित केले जाणार होते. ज्या दिवशी बैठक आहे, त्या दिवशी अधिकारी मुद्दामहून उपस्थित राहत नाहीत. प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. ब क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांच्यावर उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी तोंडसुख घेतले.