- वायसीएम रूग्णालयावरील वाढता रुग्णभार कमी करण्यासाठी इतर नागरी रुग्णालयांतही तज्ज्ञ व आपत्कालीन सुविधा वाढविण्याची केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (YCM) सर्व नागरी रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसरी विधानसभा सेवा दलाचे अध्यक्ष प्रविण पिंजण यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी YCM रुग्णालयावरील वाढता रुग्णभार कमी करण्यासाठी शहरातील इतर महापालिका रुग्णालयांची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे. ICU व Critical Care बेड वाढविणे, २४ तास Emergency व Trauma Care सेवा सक्षम करणे, आवश्यक डॉक्टर, नर्स व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, तसेच OPD साठी Appointment/Token System आणि Digital Queue Management प्रभावी करण्याची सूचना त्यांनी केली.
X-Ray, सोनोग्राफी, CT Scan, MRI आणि Pathology तपासण्या वेळेत उपलब्ध करून देणे, औषधांचा नियमित साठा ठेवणे, Ambulance, Blood Bank आणि Operation Theatre सुविधा मजबूत करणे, तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला व गंभीर रुग्णांसाठी Priority Assistance Desk सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तळवडे, चिखली, मोशी आणि भोसरी भागातील रुग्णांसाठी स्थानिक रुग्णालये व आरोग्य केंद्रांची क्षमता वाढवावी, तसेच इतर रुग्णालयांमध्ये Specialist OPD व Emergency सुविधा वाढवाव्यात, असेही पिंजण यांनी म्हटले आहे.
नागरिकांना उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती ऑनलाइन मिळावी आणि Citizen Health Facility Improvement Plan तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















