न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- २५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेतून भोसरीत आयोजित ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला सुमारे २,५०० हून अधिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी डिजिटल माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. जनसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
शत्रुघ्न काटे म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वाखालील २५ वर्षांची जनसेवा ही राष्ट्रसेवेची प्रेरणा आहे. सेवा ज्योतीच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे.”
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, आमदार महेश लांडगे, शंकरशेठ जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे, प्रशांत शितोळे, शर्मिला बाबर, मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये, संजय पटणी, सदाशिव खाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

















