- राज्याच्या महसुलाला बसणार फटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- बुलडाणा येधील सह दुय्यम निबंधक यांना शिवीगाळ व मारहाण केल्याने या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये संबंधितांवर कार्यवाही होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील दस्त नोंदणीचे काम बंद राहणार असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
कोरोना आणि लोकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दोन – तीन महिने बंद होती. याचा मोठा फटका राज्याच्या महसुलाला बसला आहे. दसरा – दिवळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दस्त नोंदणीला गती मिळून आहे. शासनाच्या तिजोरीत निधी जमा होत असताना ऐन दस-यात सर्व्हर डाऊन बंद झाल्याने आणि आता कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे संपूर्ण राज्यातील दस्तनोंदणीचे कामकाज ठप्प होणार आहे.