- पुन्हा कामांची अदलाबदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२०) :- महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजात बदल केला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २७ ऑक्टोबरला अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या कामकाजाचे वाटप केले होते.
डॉ. साळवे यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचे कामकाज, आरसीएमच, एनयूएचएम, पीसीपीएनडीटी, आरएनटीसीपी विषयक कामकाज, तारांकित प्रश्न व इतर विषय हाताळणे, शासनास पत्रव्यवहार करणे आदी कामकाज सोपविले होते. डॉ. गोफणे यांच्याकडे वायसीएम रुग्णालय वगळता वैद्यकीय मुख्य कार्यालय, पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने यांचे कामकाज, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार विभागाचे कामकाज सोपविले होते. त्यात बदल केला आहे.
डॉ. साळवे यांच्याकडे वायसीएम रुग्णालय वगळता वैद्यकीय मुख्य कार्यालय, पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने यांचे कामकाज, मध्यवर्ती औषधभांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागाचे सद्य:स्थितीत चालू असलेले कामकाज, विभागाचे विभागप्रमुख म्हणून संपूर्ण कामकाज पुन्हा सोपविले आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलरॉय यांच्याकडील कोविड केअर सेंटरचे कामकाज डॉ. साळवे यांच्याकडे सोपविले आहे. तर, डॉ. गोफणे यांच्याकडे खासगी रुग्णालय नोंदणीविषयक व त्या अनुषंगाने इतर सर्व कामकाज दिले आहे.