- मनसेकडून जोरदार प्रचार; विजयी सलामी देणार – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार निवडून यावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन नुकतेच आकुर्डी येथील खासगी हॉटेलमध्ये मनसेच्या झालेल्या बैठकीत करण्यात आले.
मनसेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रुपाली पाटील – ठोंबरे आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विद्यानंद मानकर यांच्या प्रचारार्थ मनसे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
जास्तीत जास्त पदवीधर मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदान करण्याबाबत आवाहन करावे. एका पदाधिकाऱ्याने किमान २०० मतदारांशी संपर्क साधावा, असे बैठकीत सुचविण्यात आले. त्याशिवाय, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष हेमंत डांगे, राजू सावळे, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष अंकूश तापकीर, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरसे, मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सुशांत साळवे, महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर, प्रभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्ष आदी या बैठकीला उपस्थित होते.