न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- निगडीतील ओटास्कीम येथे एकावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. २५) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती.हा गोळीबार रावण टोळीच्या चार सदस्यांनी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आता याप्रकरणातील आरोपींची निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) परिसरात धिंड काढली आहे.
दोडमणी आणि खवले यांच्यात वर्चस्व कुणाचे यावरून वाद सुरु होता. या वादातून किरण खवले या कुख्यात गुन्हेगाराने गोळीबार केला. या गोळीबारात आकाश दोडमणी याच्या पायावर गोळी लागून तो जखमी झाला होता. तसेच, दोडमणी याचा भाऊ देखील जखमी झाला होता.
परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, नागरिकांच्या मनातील भिती घालवण्यासाठी चार आरोपींची आज (शनिवारी) निगडी पोलिसांनी धिंड काढली.