- पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार होणार पिन क्रमांकाशिवाय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच डेबिट, क्रेडीट कार्डच्या नियमातील बदलांबाबत केलेल्या घोषणांची अंलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.
या नव्या बदलानुसार पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार पिन क्रमांकाशिवाय करता येणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा दोन हजार रुपयांपर्यंत होते. एक देश एक कार्ड योजनेअंतर्गत ‘रूपे’ (RuPay) या भारतीय कंपनीची डेबिट, क्रेडीट कार्ड्स दाखल करण्यात आली होती. याच्याआधारे ग्राहकांना बसच्या तिकीटापासून ते शॉपिंग मॉलमधील खरेदीपर्यंत सर्व व्यवहार करता येतात.
कार्ड हरवल्यास ताबडतोब बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करावे लागेल. तुम्हाला कार्ड हरवले आहे हे लक्षात येईपर्यंत कोणी खरेदी केली तर बँक तुम्हाला त्याची नुकसानभरपाई देईल.