- पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थांची उपस्थितीही वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- महापालिका शाळेतील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मात्र, अद्यापही खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढलेली नाही.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणाला पसंती देत आहेत. तर खासगी शाळेतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाला पसंती देत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पहिल्या दिवशी महापालिकेच्या शाळेत ३१ टवके विद्यार्थी उपस्थित होते. आता हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. तर खासगी शाळेत १० ते २० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.