- शहरात महाविकास आघाडीकडून ‘सांगली पॅटर्न’ चा प्रयत्न?..
- राम-लक्ष्मण जोडीची अग्निपरीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- भाजपचे निष्ठावंत नगरसेवक रवी लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत डावलल्याने त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपमधील नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून उद्योगनगरीत राबविण्याची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे यांनी पक्षाने डावलल्याने राजीनामा दिला आहे. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून लांडगे यांनी राजीनामा दिल्याने १५ सदस्य शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी नऊ सदस्य भाजपचे असून अपक्ष सदस्या त्यांच्याकडेच आहे. तर राष्ट्रवादीचे चार, शिवसेना एक असे एकूण पाच सदस्य आहेत. उर्वरित अपक्षांचा एक सदस्य आमच्याकडे येईल, असा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीत सांगलीत राष्ट्रवादीने भाजपचे सदस्य फोढले होते. हा पॅटर्न राबविण्यासाठी विरोधकांना भाजपचे तीन सदस्य फोडावे लागणार आहेत.
काही वर्षापूर्वी श्रीरंग बारण हे एकमेव सदस्य असताना त्यांनी राजकीय खेळी करून अध्यक्षपद निवडणूक जिंकली होती. असा चमत्कार होणार? की, भाजपचाच सभापती होणार? याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे.