- आयुक्त राजेश पाटलांकडून कार्यमुक्तीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त २ या पदावर कार्यरत असलेल्या अजित पवार यांना बुधवारी (दि. ७) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यमुक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सप्टेंबर २०१९ पासून अजित पवार हे अतिरिक्त आयुक्त २ या पदावर कार्यरत होते. ज्या दिवशी ते महापालिकेत रुजू झाले, त्याच दिवशी त्यांची पुणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त आयुक्त या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाचे दिले होते. मात्र शासनाला पाठविलेल्या एका पत्राचा आधार घेऊन ते दीड वर्षे महापालिकेत कार्यरत होते.