न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अनधिकृत फलक हटवण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. शहरातील मोठी अनधिकृत फलक हटवण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जाते. पालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पोसण्याची भमिका अधिकारी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी केला आहे. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन आहे.
यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण अनधिकृत फलक व त्यावरील आकाशचिन्ह परवाना विभागाने केलेल्या कारवाईची प्रशासनाकडे माहिती विचारली होती. परंतु, या विभागाने चक्क खोटी माहिती देवून माझ्या व जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेल्याचे या प्रकारावरून निदर्शनास आले आहे.
नगरसेवकांना जर परवाना विभाग खोटी माहिती देत असेल. तर, इतरांशी हा विभाग कसा वागत असेल. असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष घालावे व आकाशचिन्ह विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून, यामागचा खरा मास्टरमाइंड शोधण्याची या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.