न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- हॉटेल मॅनेजमेंट व विक्री व्यवस्थापन कौशल्य या क्षेत्रातील प्रदीर्घ व प्रभावी अनुभवाची दखल घेत निलेश रांगणेकर यांना हैद्राबादच्या युनायटेड टेक्नॉलॉजिकल रिसर्च युनिव्हर्सिटीची मानद पीएच. डी. पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.
डॉ. एस. वेणूगोपालाचार्य, न्यायमूर्ती बी. मधुसूदन, डॉ. आर. व्ही. चंद्रवदन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. फ्रेडरिक फ्रान्सिस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला.
निलेश रांगणेकर यांनी हॉटेल इंडस्ट्रीतील कारकिर्दीमध्ये विविध महत्वाच्या पदांवर काम केले असून सध्या ते पुणे येथील प्राईड हॉटेल येथे संचालक विक्री व्यवस्थापन या पदावर कार्यरत आहेत. हॉटेल मॅनेजमेंट व्यतिरिक्त व्यावसायिक सलागार व अर्थ सलागार म्हणूनही ते सक्रिय आहेत.