- चाचणी डेटा DCGI च्या मान्यतेसाठी रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त होते. मात्र ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
भारतात विकसित झालेल्या करोना लस कोव्हॅक्सिनचे निर्माता भारत बायोटेकने शनिवारी २-१८ वयोगटातील मुलांसाठी चाचणी डेटा DCGI ला पाठवला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.कृष्णा एला यांनी ही माहिती दिली.
“मूल्यमापन अद्याप सुरू आहे. काही गोंधळ आहे आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) त्याला मान्यता दिलेली नाही.” अशी मीहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.