न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२२) :- चाकण MIDC उद्योजक संघटनेने ”HOW TO READ PROFIT AND LOSS ACCOUNT & BALANCE SHEET” या विषयक सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनारला चाकण तसेच भोसरी MIDC मधील शेकडो उद्योजक उपस्थित होते. या सेमिनारला प्रमुख प्रवक्ते चार्टर्ड अकाउंटंट हनुमंतराव चौधरी व त्याचबरोबर सेक्रेटरी प्रविण ऊगारे यांना संघटनेने आमंत्रित केले होते.
चार्टर्ड अकाउंटंट हनुमंतराव चौधरी यांनी फायनान्शियल डिसिप्लिन व त्याचबरोबर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट तर कंपनी सेक्रेटरी प्रविण ऊगारे यांनी कंपनीचे प्रकार, त्याचे फायदे तोटे, सरकारच्या स्टार्ट अप विषयीचे धोरण याची सविस्तर माहिती ppt द्वारे दिली. चाकण MIDC उद्योजक संघटना ही उद्योजकतेच्या ऊत्कर्षासाठी नेहमीच अशा वेगवेगळ्या विषयांवरती सेमिनार आयोजित करीत असते.
सेमिनार ची संकल्पना चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे यांची होती. सेमिनारचे नियोजन संघटनेचे संचालक प्रवीण शिंदे यांनी केले. संघटनेचे संचालक शांताराम ताम्हाणे यांनी हॉलकरिता सहकार्य केले. सेमिनारचे आयोजन तसेच प्रस्तावना व सांगता चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केली.