- गंभीर जखमी इसमाचा मृत्यू; पोलीस आरोपींच्या मागावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- भांडणाच्या रागातून आरोपींनी रविवारी इसमाच्या घराजवळ जाऊन कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने इसमाचा मृत्यू झाला.
पितबसा कमलचंद जानी (वय ५७, रा. गंगा लिजंड लेबर कॅम्प, बावधन. मूळ रा. ओडिसा) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार रविवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास बावधन येथे घडला.
उपेंद्र पितबसा जानी (वय १७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे उर्फ कळवा, आकाश पवार उर्फ चेल्या आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.