न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- थेरगाव येथील रहाटणी फाटा येथे सत्यशीला यांचे स्वाती कलेक्शन हे कपड्यांचे दुकान आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला.
दुकानातून कपडे, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ९१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. सत्यशीला शिवाजी बामणकर (वय ५३, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















1 Comments
VIAGRA FOR YOU
Seks is breed beschikbaar op speciale platforms voor volwassenen. Kies
voor betrouwbare adult hubs voor veiligheid.
Here is my page :: VIAGRA FOR YOU