न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२५) :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती काळेवाडी येथे पावना हेल्थ क्लब च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
मागील सलग दोन-तीन वर्षांपूर्वी क्लबच्या वतीने ग्रंथालय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस मदत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन महामानवांची जयंती साजरी केली होती. या वर्षी क्लबच्या वतीने सकाळी सात ते नऊ असे सलग दोन तास पुस्तक वाचन करून महामानवांना अभिवादन करण्यात आले यावेळी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आजच्या युगामध्ये हल्ली मुले पुस्तकाकडे दुर्लक्ष करीत आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ असा उपदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांसाठी शाळा उघडल्या, दलित शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न केले. खऱ्या अर्थाने ‘मस्तक सुधारायचा असेल तर पुस्तक वाचावं लागेल’ असे प्रतिपादन अध्यक्ष संजय पगारे यांनी केले.













