राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२५) :- भारतीय समाजाचे महान नेते भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या योगदानाद्वारे तत्कालीन समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले. त्यांच्या मते, “ज्या व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते तो समाजापासून वंचित असतो.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला. त्यांची जयंती देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केले जाते. त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या सन्मार्थ ‘जय भीम’चा नारा देतात. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, तसेच भीमराव आंबेडकर हे एक महान नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन भारताला समान आणि न्याय्य समाज बनवण्यासाठी समर्पित केले. भारतीय लोकशाहीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील, त्यांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपर येथील पुतळा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, मा.नगरसेवक सतीश दरेकर, मा.नगरसेविका अमिना पानसरे, ॲड.गोरक्ष लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, मा.शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफणे, असंघटित कामगार अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, दीपक साकोरे, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे संपत पाचुंदकर, तुकाराम बजबळकर, गोरोबा गुजर, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, प्रवीण गव्हाणे, झहीर उर्फ छोटू खान, बाळासाहेब पिल्लेवार, रवींद्र सोनवणे, रामप्रभू नखाते, राजू चांदणे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, चिटणीस नीलम कदम, बापू सोनवणे, चंद्राम हलगी, अशोक मोरे, महेश माने, कुमार कांबळे, अंकुश बिराजदार, रामकिसन माने, शैलेश माहुलीकर, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनिल अडागळे, यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.