न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाच्या पाचव्या दिवशी महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रांमधील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड,, निवृत्त परिक्षेत्र वन अधिकारी तसेच सावित्रीबाई फुले अकादमी वाकडचे संचालक रंगनाथ नाईकडे, निवृत्त सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, ग्रंथालय प्रमुख कल्पना जाधव, ग्रंथपाल प्रविण चाबुकस्वार, वर्षा जाधव, राजु मोहन, वैशाली थोरात, कांचन कोपर्डे, राजेंद्र आंभेरे, लिपीक सुभाष गुटूकडे कामगार नेते तुकाराम गायकवाड तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यमुनानगर येथील स्पर्धा परीक्षा केंद्रातील राजश्री तोडकर, महादेव शिंदे, धर्मराज शिंगटे, रिया बनसोडे, आप्पासाहेब मगदूम, रधुनाथ सातव, संभाजीनगर येथील स्व. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्रातील ऋतुजा म्हांबरे, प्रशांत जाधव, विनायक पडवळ, स्वाती भुसारी, भोसरी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विशाल पवळ, दिनकर क्षीरसागर, वाकड येथील सावित्रीबाई फुले अकादमीमधील वैष्णवी नाईकरे, हनुमंत रसाळ, शीवप्रसाद जाधव, सौरभ पाटील, मनीष हिंगे यांचा समावेश होता. यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.