न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- घरा समोरच्या रुममध्ये राहणारे काका हे घराबाहेर अंडर पॅन्ट वर उभे होते. त्यांना घरा समोर बिनाकपडयाचे उभे राहु नका. पुर्ण कपडे घाला काका, असं तरूणाने म्हटले. त्याचा राग आल्याने काकाने तरूणाला शिवीगाळ करुन घरातील बर्फ फोडण्याचा लोखंडी टोच्या आणुन ‘थांब तुला दाखवितोच’ असे म्हणून तरूणाच्या तोंडावर मारला आहे.
ही घटना (दि.१६) सकाळी ०९.३० वा. सुमा. उरो क्वॉर्टस, औंध येथे घडली. सागर शिंगाडे (वय. ३१ वर्षे) यांनी आरोपी सतिश कृष्णा लोखंडे (वय. ५७ वर्षे) यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















