न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- दोघे भाऊ कामावरुन निगडी ते देहूरोड रस्त्याने मुंबईकडे जाणारे हायवे रोडवरुन घरी येत होते. केंद्रीय विदयालयाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील दिपक राजोरीया व योगेश राजोरीया हे गंभीर जखमी झाले.
त्यांना वैदयकीय मदतीची आवश्यकता असताना देखील ती न देता, त्या जागेवरुन अज्ञात वाहनचालक निघून गेल्याने दोन्ही भावांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. १५) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. रूपेश राजोरिया यांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरून देहुरोड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
















