न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२५) :- दोन दिवसापुर्वी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन पाण्याचे जार फेकुन दिले. फिर्यादीस शिवीगाळ करून हॉटेल मधील टेबल खुर्ची तोडुन, आरोपी क्र १ यांनी फिर्यादीस बेल्डने छातीवर, बांबुने डावे पायावर मारुन जखमी केले.
फिर्यादीचा भाऊ अर्जुन यास आरोपी क्र २ याने कोयता डोक्यात मारुन जखमी करुन हॉटेल मधील खुर्चा टेबल ची तोडफोड करुन नुकसान करीत पळुन गेले आहेत. हा प्रकार (दि. १७) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हॉटेल दोस्ती, पवारवस्ती चिखली येथे घडला. कन्हैया अशोक रस्तोगी यांनी आरोपी १) वृषभ मानके व २) घनश्याम यादव या दोघांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरून चिखली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












