न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२५) :- रावेत येथील मराठा पॅलेस हॉटेल समोर शुक्रवारी (दि. १८) रात्री ०१.०१ वा सुमारास मिक्सर चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवुन कारला पाठीमागुन जोराने धडक दिली. या धडकेत कार मधील श्रीधर भोसले व पोशि/जाधवर यांना किरकोळ जखमी व कारचे नुकसान करण्यास वाहनचालक कारणीभुत झाला आहे.
याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक कैलास भिकु डाबेराव नेमणुक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांनी आरोपी जितेंद्र कुमार महतो (वय २३ वर्षे रा. मामुर्डी देहुरोड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावेत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बी एन एस एस कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस दिली आहे.












