न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२५) :- चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पतीला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने लघुशंकेचा बहाना करून स्वच्छतागृहात जात फरशी पुसण्याचे लिक्विड पिऊन चिखली पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शरद रूपचंद चितळे (वय ३५, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, त्यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे. चिखली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली आहे.












