न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- वाकड पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या परिविक्षाधीन महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका शिवाजी कारंडे यांनी ठाणे येथे पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ मध्ये खो-खो या स्पर्धेमध्ये कास्य पदक पटकावले आहे.
दरम्यान जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कब्बडी क्लस्टर पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ मध्ये खो-खो या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच पुरी (ओरिसा) येथे पार पडलेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधीत्व करुन दैदिप्यमान यश मिळविले.
या महिला पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पुष्पगुच्छ देवुन गौरव केला. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परि-१ स्वप्ना गोरे मॅडम हे हजर होते.











