न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करुन ०२ गुन्हे उघडकीस आणत एकुण १७,००,०००/- लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जप्त केला आहे.
अनिकेत उध्दव कडलग (वय २८ वर्षे रा. जवळे कडलग, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजुबाजुच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्याआधारे निघोजे येथील ट्रॅक्टर चोरी गेलेले ठिकाण ते आळेफाटा असा अंदाजे ७० किलोमीटर पर्यंत चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतला. आरोपीला संगमनेर येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरचा ट्रॅक्टर चोरी केला असल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने जाधववाडी, चिखली येथुन आणखी एक पिकअप चोरी केलेला असल्याचे सांगितले. त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर व जाधववाडी, चिखली येथुन चोरलेला महींद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप असा एकुण १७,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन एकुण दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितिन गिते पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रविण कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सपोफौ राजु कोणकेरी, पोहवा अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर संतोष काळे, पोकों / शिवाजी लोखंडे, मंगेश कदम, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणे अमोल माटे, राजेश गिरी, शरद खैरे यांनी केली आहे.











