न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या शुभेच्छा दिल्याने एका ५० वर्षीय इसमाने महिलेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना १७ फेब्रुवारी ते २० मे या कालावधीत विठ्ठलनगर पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी सोमवारी (दि. २०) रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमेश दादुराव साळवे (५०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने आरोपी साळवे याला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ च्या शुभेच्छा दिल्या होत्या.
तेव्हापासून रमेश महिलेला वारंवार ‘तू मला व्हॅलेंटाईन डे ला विश का केलंस’ अशी विचारणा करीत होता. सोमवारी त्याने पुन्हा विचारणा करीत महिलेशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे महिलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या शुभेच्छा देणे चांगलेच महागात पडले आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.











