न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- आरटीईची पहिली फेरी कधीच संपली आहे. तरीदेखील ज्यांच्या पाल्यास पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही, असे पालक दुस-या फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. आरटीईची दुसरी फेरी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड आरटीई कृती समितीच्या अध्यक्षा सोनाली आल्हाट यांनी केली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी संपली आहे. प्रवेशाची प्रत्येक फेरी संपल्यानंतर पुढची फेरी कधी होईल, याची कोणतेही माहिती मिळत नसल्यामुळे पालक दुस-या फेरीच्या प्रतीक्षेत आहेत, अशी मागणी सोनाली आल्हाट यांनी प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.











