न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य पदासाठी येत्या गुरुवारी (दि. २४) निवडणूक होणार आहे. हवेलीचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात होणाऱ्या विशेष सभेत ही निवड होणार आहे. विद्यमान उपाध्यक्षांची मुदत नुकतीच संपली आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे उपाध्यक्षपदासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर अर्ज छाननी होईल. छाननीनंतर पंधरा मिनिटांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लगेच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
नामनिर्देशित सदस्यासाठी सकाळी दहा ते बारा यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून उपाध्यक्षपदाच्या छाननीबरोबर या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर लगेच निवडणूक होईल.











