- हिंजवडीतील पाचजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- फसवणुक करण्याच्या उद्देशाने पाच जण “Cricline”, “Cricket live Line”, “CricBuzz” अशा विविध सोशल मिडीया अॅपव्दारे आय.पी.एल २०२५ मध्ये चालु असलेल्या दिल्ली कॅपीटल्स विरुध्द लखनऊ सुपर जाईंट टी २० क्रिकेट मॅचवर क्रिकेट बेटींग हा जुगार खेळत आणि खेळवत होते.
यासाठी मोबाईल व लॅपटॉपचा वापर तसेच दुस-याच्या नावावरील सिमकार्ड व बँक खाते वापरले जात होते. पोलीसांनी (दि.२२) रोजी रात्री ९.४१ वा. सुमारास फेज १, हिंजवडी येथील एका सोसायटीत कारवाई करून ५,२०,६१०/- रु. ०४ लॅपटॉप, १८ मोबाईल जप्त केले आहेत.
गणेश शंकर मेदगे, पो.हवा. २९२०, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी आरोपी १) अंकुश यशवंत कुशवाह वय २९ वर्षे, 2) विक्रम ललीत झा वय २५ वर्षे, ३) आयुष कुमार झा वय २६ वर्षे, ४) गौरव शिवराम ठेंगरी वय २६ वर्षे, ५) प्रेमकुमार ईश्वरदास राजवाणी वय ५२ वर्षे यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पांचाळ पुढील तपास करीत आहेत.














