न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- सायबर गुन्हयासाठी बँक अकाऊंट घेण्यासाठी दुबई येथुन भारतात आलेल्या दोघांना सायबर पोलीसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघड केला आहे. इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन (IYDF) नावाच्या एका गैर सरकारी संस्था (NGO) ची माहीती देवुन त्यांचे “Wealth On Go” नावाचे अॅप्लिकेशन च्या प्लॅटफॉर्मवरुन मॅच्युरिटीचे फिक्स इन्कम प्रोडक्ट, इक्विटी प्रोडक्ट, हायब्रीड असेट, बॉन्ड इ. इत्यादीमध्ये गुंतवणूक करून दररोज १ टक्का परतावा कमविण्याचे अमीष दाखवुन सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास संपादन केला व त्यानंतर वेगवेगळ्या बैंक अकाऊंटमध्ये एकुण ६६,६३,३१९/- रुपये भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली.
फिर्यादी यांनी सदर व्हॉट्सअपधारक, अॅप्लिकेशनधारक, बैंक अकाऊंटधारक व निष्पन्न होणारे इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने सायबर पोलीस ठाणे येथे गुरनं. १२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४). ३१६(२), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक ही मोठ्या स्वरुपाची असल्याने व अशा प्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिबंध होणेकामी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करणेकामी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. त्याप्रमाणे सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता व तपासकामी पोउपनि वैभव पाटील यांची पथके तयार करुन गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन करुन कामाचे विभाजन केले होते.
त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पोलीस अंमलदार दिपक माने हे फिर्यादी यांचे फसवणुक झालल्या पैश्याचे ट्रान्डोक्शन संदर्भात तपास करीत असतांना त्यांना कोटक बँकेच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सपर झाले असल्याच प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर कोटक बैंक अकाऊंट धारकाची माहीती घेतली असता सदरचे बैंक अकाउंट न्यु महालक्ष्मी पाईप फिटींग या नावाने इसम नामे अमित सुनिलकुमार केसवाणी रा. कोल्हापुर या व्यक्तीच्या नावाने असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्यानंतर मा. वरीष्ठांची परवानगीने पोउपनि वैभव पाटील व पथक हे जि. कोल्हापुर व परीसराव स्वाना करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांनी तांत्रिक उपास करन अकाऊंट धारक अमित सुनिलकुमार केरावाणी याव्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने सदरचे बैंक अकाऊंट हे कमल भजन तेजवाणी रा. जि. कोल्हापुर याला दिले असल्याने सांगीतले. त्यावरुन कमल भजन तेजवाणी याबा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने अमित केसवाणी याच्याकडुन घेतलेले कोटक बैंक अकाऊंट व इतर २० बॅक अकाउंट नरेंद शिशराम सिंग सध्या रा. दुबई याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडुन पैसे घेतले असल्याचे सांगीतले. त्यानंतर सपोनि प्रविण स्वामी व पोउनि वैभव पाटील यांनी कौशल्यपुर्वक तपास केला असता नरेंद्र शिशराम सिग हा ०२ दिवसापुर्वीच भारतामध्ये जि. कोल्हापुर, महाराष्ट्र येथे आल्याची माहीती मिळाली. त्यानंतर कोल्हापुर येथिल वेगवेगळ्या ५० बैरेक मध्ये त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता तो भारतामधील व्यक्तींचे बैंक अकाऊंट काढायला लाग्न से अकाऊंट दुबई येथे चालवित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तो पाहीजे आरोपी विकिसंदिप यूनिल, यांच्या सोबत गुन्हा करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. व्यावरन कमल भजन नाणी व नरेंद्र शिशराग सिंग याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील फसवणुकीच्या रकमेबाबत व आरोपी यांनी भारतातील किती बैंक अकाऊंट दुबई येथे नेऊन चालवले याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशिकांत महावरकर -सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि, सागर पोमण, पोउनि, वैभव पाटील, पोउनि, विदया पाटील, पोउनि प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार, दिपक माने, हेमंत खरात, स्वप्निल खणसे, अतुल लोखंडे, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, संतोष सपकाळ, विशाल निचित, परशुराम चव्हाण, दिपाली चव्हाण, जयश्री पाटील, ईश्वरी अंबरे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.