न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२५) :- काश्मीरमधील येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष अॅड. सुहास पडवळ, अॅड. राजू माधवन, अॅड. सुशील मंचरकर, ज्येष्ठ वकील अॅड. नवीन वालेचा, अॅड. संगीता परब, अॅड. रघुवीर गायकवाड, अॅड. चंद्रकांत माने, अॅड. श्रीपाद कुलकर्णी, अॅड. उत्तम फाळके, अॅड. मधुकर सोनार, अॅड. केशव घोगरे, अॅड. समीर चव्हाण, अॅड. किशोर झांजे, अॅड. प्रताप साबळे, अॅड. विवेक गुप्ता, अॅड. प्रतीक जगताप, अॅड. आदित्य राजेभोसले, अॅड. अस्मिता पिंगळे, अॅड. सौरभ काटे, अॅड. सनी काटे व वकील बांधव उपस्थित होते.
शोकसभेचे आयोजन पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव अॅड. उमेश खंदारे, उपाध्यक्ष अॅड. अनिल पवार, मा. सचिव अॅड. धनंजय कोकणे, खजिनदार अॅड. अक्षय फुगे, सदस्य अॅड. संघर्ष सूर्यवंशी, अॅड. मानसी उदासी, अॅड. संकेत सरोदे यांनी केले.


















